नाशिकमध्ये कोरोना बधितांची वाढली संख्या, आरोग्य विभागास अभ्यास करण्याचे आदेश

0

नाशिक :- कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधीतांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरीकांकडून आरोग्य नियमांचे पालनच हेात नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोरेाना प्रतिबंधक लसीकरण दहा मार्चपासून सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील काेरोना स्थितीचा आढावा शनिवारी (दि.१३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये शासकीय लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली तर त्यात बाधीत असल्याचे अहवालाची सरासरी ५ ते ७ टक्के आहे. मात्र, खासगी लॅबमध्ये हीच सरासरी २८ टक्के इतकी आहे. म्हणजेच खासगी लॅबमध्ये बाधीत असल्याचे प्रमाण अधिक आढळते आहे. त्यामुळे यासंदर्भात देखील अभ्यास करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आणि अन्य संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. ज्या रूग्णांचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझीटीव्ह आहेत, त्यांची शासकीय लॅबमध्ये देखील तपासणी करण्यात येणा असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात एकुण ५९ हजार व्यक्तींना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट हेाते. १० फेब्रुवारी पर्यंत हेच उद्दीष्ट ३६ हजार होते. परंतु प्रत्यक्षात मात्र २९ हजार व्यकींनाच लस देण्यात आली आहे. म्हणजेच ८१ टक्के लसीकरण झाले आहे. लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी लस घेतल्या आहेत. परंतु त्यांना कोणत्याही प्रकाराचा त्रास झाला नाही, त्यामुळे संबधींतांनी लस घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.