जामनेरात नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते नवीन रस्ते भांधकामाचे भूमिपूजन

0

जामनेर(प्रतिनिधी):- नगरपालीकेच्या माध्यमातुन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पैशांची कमतरता पडु देणार नसल्याचे प्रतीपादन नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केले.

शहराच्या सौंदर्यासाठी विवीध भागांमधे अनेक लोकाभिमुख विकासाची कामे एकतर पुर्ण झाली आहे,तर काही विकासकामे प्रगती पथावर आहेत. अशिही माहिती नगराध्यक्षांनी आपल्या मनोगता मधुन दिली काल दी.१२ रोजी नगराध्यक्षा साधना महाजनांच्या हस्ते शहराच्या वेग-वेगळ्या भागांमधील सुरू करण्यात येणाऱ्या नवीन रस्ते बांधकामांचे भुमीपुजन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील,गटनेते डॉ प्रशांत भोंडे,नगरसेवीका ज्योती पाटील,किरण पोळ,शिक्षण संस्थेचे सचिव जितु पाटील,महेंद्र बावीस्कर,रतन गायकवाड,नाजीम शेख,अनीस शेख,बाबुराव हिवराळे,सुहास पाटील, फारूख मन्यार,सुभाष सुरवाडे,खलील भांजा,सुभाष पवार,रवींद्र झाल्टे आदी विवीध रस्ते भुमीपुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.शहरातील जामनेरपुरा, ईस्लामपुरा,पहुरगल्ली,कोर्टमोहल्ला आदी कॉलनी भागांसह गांधी चौकातील मुख्य रस्त्यांचा आजच्या भुमीपुनजनामधे समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.