राष्ट्रवादीत नाराजीनाट्य?; प्रदेशाध्यक्षांसमोरच पक्षातील गटबाजीचे दर्शन

7

जळगाव: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’ निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शनिवारी दुपारी जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरुन माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली. इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’निमित्त गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज शनिवारी यात्रेच्या समोरोपाच्यावेळी जळगाव शहर व ग्रामीण विभागाचा मेळावा जळगावातील लेवा भवनात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतिष पाटील, मनिष जैन, संतोष चौधरी, दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील,रोहीणी खडसे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारणीची माहीती जाणून घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातील राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने ताकद कमी झाल्याची माहीती दिली. तसेच गुलाबराव देवकरांकडे उंगलीनिर्देश करीत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. तसेच नेत्यांना मतभेद मिटविण्या सांगा अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. यानतंर गुलाबराव देवकर यांनी अश्या छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी करु नका असे ज्ञानेश्वर महाजन यांना सांगतांनाच धरणगाव तालुक्यात माझ्या खर्चाने लावलेल्या फलकांवर तुमचा फोटो लावल्याची अठवण त्यांना करुन दिली. एकूणच संघटना मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मेळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीचे दर्शन झाल्याने नेतेही नाराज झालेत.

7 Comments
  1. shell download says

    With havin so much content do you ever run into any issues
    of plagorism or copyright infringement? My
    website has a lot of completely unique content I’ve either created myself or
    outsourced but it seems a lot of it is popping it up all over
    the web without my permission. Do you know any ways to help
    reduce content from being ripped off? I’d truly appreciate it.

  2. I know this if off topic but I’m looking into starting my own weblog and was wondering what all is required to get
    setup? I’m assuming having a blog like yours would cost a pretty
    penny? I’m not very web smart so I’m not 100% certain. Any tips or advice would be greatly appreciated.

    Cheers

  3. Sed lacinia, urna non tincidunt mattis, tortor neque adipiscing diam, a cursus ipsum ante quis turpis. Nulla facilisi. Ut fringilla. Suspendisse potenti. Nunc feugiat mi a tellus consequat imperdiet. Vestibulum sapien. Proin quam. Etiam ultrices. Becka Shaughn Reisch

  4. erotik says

    I was able to find good info from your blog articles. Shela Mychal Marler

  5. erotik says

    What an exciting trip! Love the landmarks you chose to visit. How awesome! Melisa Mendel Pomeroy

  6. turkce says

    Hello there! I simply wish to offer you a big thumbs up for the great information you have here on this post. I am returning to your blog for more soon. Henrie Tobie Bogoch

  7. erotik says

    Hi, Being, It was really informative articles. I was searching for the best image compressor online and finally, I got updated information on your website, I appreciate your hard work and please keep posting more blogs so that we can enrich our knowledgebase. Thank You Vinny Koenraad Trainer

Leave A Reply

Your email address will not be published.