नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला आहे. तर राणे यांना महाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अटक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

नाशिक, पुणे आणि महाडमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

सोमवारी आपल्या जनआशीर्वाद दौऱ्याच्या दरम्यान महाड येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर आज राज्याचं राजकारण तापलं असून ठिकठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केले. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.