नांदेड हजरत निजामुद्दीन साप्ताहिक गाडी सुरु

0

भुसावळ :- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्यां सुविधेकरीता दिनांक 19 मार्च 2019 पासून नांदेड हजरत निजामुद्दीन मराठवाड़ा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही साप्ताहिक गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ही गाड़ी दर मंगळवार व दर बुधवार रोजी नांदेड़ व हजरत निजामुद्दीन येथून धावणार आहे.

गाडी क्रमांक 12753 नांदेड हजरत निजामुद्दीन मराठवाड़ा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही साप्ताहिक गाडी नांदेड़ येथून दिनांक 19 /3/2019 पासून दर मंगळवारी नांदेड़ येथून सकाळी 8 वाजता निघेल. ही गाडी दस- या दिवशी दुपारी 1 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहचेल.

तर गाडी क्रमांक 12754 ही गाड़ी हजरत निजामुद्दीन येथून 20/3/2019 रोजी पासून दर बुधवारी संध्याकाळी 7.50 वाजता निघेल व दुस-या दिवशी रात्री 1 वाजता ( शुक्रवार ) रोजी नांदेड येथे पोहचणार आहे . दरम्यान प्रवासात ही गाड़ी परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भोपाळ, झाशी, आणी आग्रा कैट या स्थानकावर थांबणार आहे. तरी प्रवाश्यानी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.