धावत्या रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे वय ३० ते ३५  गटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर अंदाजे ३० ते ३५ वय गटातील पुरुष धावत्या रेल्वेतुन पडल्याने मृतावस्थेत  आढळला असल्याबाबत आज बुधवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला आहे.

सदर मृतदेहाच्या जवळ काळ्या रंगाचा बूट सापडला आहे. त्यावरूनच त्याची ओळख पटविता येणार आहे. कपडे देखील खराब झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.हे.काँ. अनिल फेगडे ,पो.हे.काँ.अनिल मोरे,पो.हे.काँ.सतिष हाळनोर, दापोरा पोलिस पाटील जितेश गवंदे यांनी सकाळी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.