खिशाला कात्री; गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने त्रस्त  झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरमध्ये भरघोस वाढ झाली असल्याने जनतेला मोठा झटका बसला आहे.

डिसेंबर महिन्याचा आजचा पहिलाच दिवस असून आजपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. सहा ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.