धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

पाचोरा –
पाचोरा येथुन जवळच असलेल्या गाळण रेल्वे स्थानका नजीक डाऊन लाईन ट्रक वर (रेल्वे कि.मी. खंबा नं. 361/27/29) जवळ सुमारे 55 वर्षीय इसमाचा धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत इसमाची उंची 5 फुट 7 इंच, रंग काळा – सावळा, दोन्ही हातांच्या पंज्यावर ओम गोंदलेले, अंगात मळकट आकाशी रंगाचे शर्ट, त्यावर राखाडी रंगाचे जरकीन, काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली आहे. सदर घटनेचा तपास पाचोरा रेल्वे पोलिस इंन्चार्ज ईश्र्वर बोरुडे हे करित असुन मयता बाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा रेल्वे पोलिसात संपर्क करावा असे आवाहन तपासी रेल्वे हवालदार ईश्र्वर बोरुडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.