गुटख्याचे कुपन विक्री प्रकरणी पाचोर्‍याच्या युवकास मध्य प्रदेशच्या पोलिसांनी घेतले ताब्यात

0

पाचोरा –
विमल गुटख्याची विक्री करतांना सोबतच्या बॉक्स मधील कुपनांची विक्री केल्याच्या संशयावरून सिंधी कॉलनी, पाचोरा येथील एका युवकास बुर्‍हाणपुर (मध्य प्रदेश) येथील कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पाचोरा येथील एका युवकास कुपन विक्रीच्या आरोपाखाली चौकशीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात अटक करून नेल्याने शहरातील गुटखा विक्री करणार्‍या व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी सनी टेकचंद पंजाबी या युवकाने बुर्‍हाणपूर येथील दोन व्यापार्‍यांकडून गुटख्याच्या बॉक्समध्ये निघणारे कुपन्स आणुन ते कंपनीला पाठविले होते. याप्रकरणी कोतवाली (बुर्‍हाणपूर) येथील पोलिसांना सुगावा लागल्याने पोलिसांनी बुर्‍हाणपूरच्या दोन संशयीत आरोपींना खाजगी वाहन (स्कार्पियो क्रं. एम. सी. 68. 0241) या वाहनात आणुन कुपनाची विक्री करणार्‍या संशयीत आरोपी सनी पंजाबी याची ओळख पटविण्यासाठी आणल्यानंतर त्या आरोपींनी पंजाबी यास ओळखतो असे सांगितल्यानंतर बुर्‍हाणपूर येथील पोलिसांना सनी पंजाबी यास चौकशीसाठी घेऊन जात असल्याची पाचोरा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. संशयीत आरोपींकडुन सुमारे एक ते दिड लाख रुपयांचे कुपन कंपनीकडे जमा केल्याचा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.