ईश्वरलाल जैन यांनी आधी रा.काँ. चा राजीनामा द्यावा

0

रा.काँ. विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांची मागणी

जामनेर, दि.17-
जामनेर मतदारसंघ सोडुन मि जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य करणार आहे, असे म्हणणार्‍या माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी आधी पक्षाचा रितसर राजीनामा देऊन खुशाल भारतीय जनतापक्षाचे काम करावे असे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी केले.श्री.पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात काल दि.17 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे,विनोद माळी आदी उपस्थित होते.पत्रकार परीषदेचा मुळ विषय होता येत्या 19 तारखेला शहरात येणार्‍या राष्ट्रवादी पक्षाच्या परीवर्तन यात्रे विषयीची माहिती देण्याचा,मात्र गेल्या पंधरा दिवसांपुर्वी काळखेडा येथील कार्यक्रमात माजी खासदार जैन यांनी केलेल्या कथीत वरील वक्तव्याचीच जास्त चर्चा तालुकाध्यक्ष व विधानसभाक्षेत्रप्रमुखांनी केली. पक्षाने केलेले अनंत उपकार ईश्वर जैन विसरलेत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी प्रदेश खजीनदार व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचेवर अनंत उपकार केलेले आहेत,उतराई होता येत नसेल तर पक्षाला सोडचिठ्ठी का देत नाही असा सवालही तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.आम्ही त्यांच्या सर्व वक्तव्यांची तक्रार पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ तक्रार वरीष्ठ नेत्यांना, पदाधिकार्‍यांकडे देणार आहोत.आणी त्यांचेवर कारवाई करण्याचा आग्रह धरणार आहोत असेही पाटील द्वयांनी सांगीतले.यावेळी पत्रकारपरीषदेत मंत्री गिरीश महाजनांवर ही टिका करण्यात आली.बारामतीचे नंतर पहा आधी जामनेर तालुका टँकर मुक्त करा असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेच्या तालुका पदाधिकार्‍यांनी ना.गिरीष महाजनाना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.