भगवान बाबा मूर्तीची विटंबन करणार्यावर कठोर कारवाई कराव वंजारी सेवा संघाची मागणी

0

जामनेर,दि.17/ प्रतिनिधी:-
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
ट्ठसर्व समाज मनातील जाती-पातीची भिंत तोडून माणुसकीची भिंत उभी करणारे,तसेच समाजातील वाईट चाली-रिती च्या विरोधात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा समावेश होतो. अहमदनगर जिल्ह्यातील भळवणी या गावात शिल्पकार-प्रमोद कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे मूर्ती बनविण्याचे काम सुरू होते.भगवान बाबा यांची सुंदर अशी मूर्ती पूर्ण झालेली असतांना गावातील काही समाजकंटकांनी शिल्पकार-प्रमोद कांबळे यांना शिवीगाळ करीत मूर्तीची नासधूस करून पुतळ्याचे वेगवेगळे अवशेष करून शेजारील शेतात फेकून दिले.मूर्तीची झालेली विटंबना हा प्रकार निंदनीय असून भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे दिसून येत आहे. भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने संपूर्ण समाजात रोष निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मूर्तीची विटंबना करणार्‍या समाजकंटकाना अटक करून कठोर स्वरूपाची कारवाई व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी भगवान बाबांच्या भक्तांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच विषयास अनुसरून वंजारी सेवा संघ, जळगांव(जिल्हा)यांनी जामनेरचे तहसिलदार-नामदेव टिळेकर यांना निवेदन दिले. यावेळी वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष-किशोर पाटील,अजय नाईक,जितू काळे,जितू पालवे,कैलास पालवे,संजय पाटील,के.बी. पाटील,ओम खुरपडे,वैभव पाटील,नितीन पाटील,विजय पाटील,जगदीश कापडे, निलेश पाटील,संभाजी दहातोंडे,अनंत पालवे,रितेश पाटील,दत्तू काळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उ

Leave A Reply

Your email address will not be published.