धवलसिंह मोहिते-पाटील शिवसेनेतून हकालपट्टी

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर रणजितसिंह यांचे चुलत भाऊ व शिवसेना नेते धवलसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. दरम्यान, धवलसिंह यांनी बुधवारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.

तर दुसरीकडे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ऊदधव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, त्यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेचा राजीनामा दिला होता. ते एक-दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.