धक्कादायक.. 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह बाळाचा जन्म

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपण रोज नवनवीन आश्चर्यजनक बातम्या वाचत असतो.  मात्र आजची बातमी यापेक्षा वेगळी आहे. ब्राझीलमध्ये एका महिलेने एका बाळाला जन्म दिला मात्र हे बाळ विचित्रपणे जन्माला आल्याने सर्वत्र चर्चा घडली आहे.

ब्राझीलमध्ये 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह एका बाळाचा जन्म झाला आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असून डॉक्टरही यामुळे हैराण झाले आहेत. कोट्यवधींमध्ये एखादच लहान बाळ असे जन्माला येत असल्याचे आता समोर आले आहे. या बाळाच्या शेपटीचे टोक क्रिकेटच्या बॉलसारखे गोल असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉक्टरांनी शेपटीसह अशाप्रकारे बाळ जन्माला येणे हे अत्यंत दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे. बाळाच्या जन्मासंबंधित महत्त्वाची माहिती आणि काही फोटो हे एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ब्राझीलच्या फोर्टालेजा या शहरातील अल्बर्ट सबिन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आहे. अल्ट्रासाऊंड स्कॅननंतर मुलाच्या नर्वस सिस्टममधून शेपूट असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी केस रिपोर्टनुसार, ऑपरेशन दरम्यान बाळाला कोणताही त्रास झालेला नाही.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या गर्भात असताना प्रत्येक भ्रूणालाच शेपटी असते. भ्रूण जसजसा मोठा होत जातो, त्याला आकार येत जातो, तसतशी शेपटी नष्ट होते; मात्र काही अगदी दुर्मिळ केसेसमध्ये ही शेपटी जन्मानंतरही तशीच राहते. या बाळाबाबतही असंच झालं. बाळाची शेपटी मांसाची होती आणि त्यात कोणतेही हाड नव्हते. या बाळाच्या शेपटीची लांबी 12 सेटींमीटर इतकी वाढली होती. या शेपटीचे टोक क्रिकेटच्या बॉलसारखे गोल होते. हे पाहून सुरुवातीला डॉक्टर्सही हैराण झाले होते.

आतापर्यंत हाड नसलेल्या शेपटीसह 40 बाळं जन्माला आल्याची नोंद आहे. मात्र ही शेपटी मज्जासंस्थेशी जोडली गेली नव्हती. त्यामुळे ती ऑपरेशन करून काढता येऊ शकली, असे सोनोग्राफीच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ती काढण्यात आली. या बाळाचा जन्म नियोजित तारखेआधी झाला होता. बाळाची तब्येत व्यवस्थित आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.