धक्कादायक : हवाई दलाच्या तळावजवळ आढळला जिवंत बॉम्ब

0

बिकानेर :- राजस्थानातील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळावजवळ एक जिवंत बॉम्ब अढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बॉम्बची तपासणी करण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अद्याप अधिक माहिती कळू शकलेली नाही.

गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे. यापूर्वी पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळावर अशाच प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या जिवंत बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.