धक्कादायक.. विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  

पुणे जिल्ह्याच्या भोरतालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार  केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समजल्यानंतर आरोपींनी डाव साधला आहे.

एकट्या महिलेला गुरांच्या गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं असून सर्व आरोपी भांबवडे येथील रहिवासी आहेत.

पीडितेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचा पती शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान, फिर्यादी महिला शेतात जात असताना, आरोपींनी तिला अडवलं आणि तुझ्या पतीने मोबाइल चार्जर आणि पॅंट देण्यास सांगितलं असल्याची बतावणी केली. यावेळी संबंधित वस्तू मी स्वत: घेऊन रुग्णालयात जाईल, असं पीडितेनं आरोपींना सांगितलं.

यामुळे संतापलेल्या आरोपींनी पीडितेला धमकी देत निघून गेले.  पण सायंकाळी सहा वाजता घरी जाण्यापूर्वी गुरांना चारा टाकण्यासाठी पीडित महिला गोठ्यात गेली. यावेळी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे दोघांनी गोठ्यात शिरून जबरदस्ती करत फिर्यादीवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं स्वत: राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.