धक्कादायक : वडगाव येथील निरागस ३ वर्षाच्या बालकाचा अपहरण करुन खून

0

भडगांव (प्रतिनिधी) : भडगांव तालुक्यातील वडगांव सतिचे येथील प्लॉट ऐरीयातील एका तीन वर्षाच्या निरागस बालकांचे अपहरण झाल्याचे  वृत्त असतांनाच त्या बालकांचा मृत्युदेह वडगांव हायस्कुलजवळील दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे कीतालुक्यातील वडगांव बु.येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा चि.आयुष दिपक गायकवाड वय ३ वर्ष राहणार वडगाव सतीचे तालुका भडगाव हा मुलगा वडगाव सतीचे गावावरून दि.१४ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास मिसिंग झालेला होता त्याचा मुत्यदेह वडगांव हायस्कुल जवळील दिलीप जाधव यांच्या शेतातील विहीरीत रात्री १०: ३० वाजता आढळुन आल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

याबाबत दि.१४ रोजी भडगांव पो.स्टे ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बालकाचा मुत्यु कसा झाला ? याबाबतचे मुत्युचे कारण अद्यापावेतो अस्पष्ट जरी असले तरी सशंयित आरोपी म्हणुन भडगांव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.याबाबत पुढील तपास भडगांव पोलिस करीत आहे.या घटने बाबत रात्री उशीरापर्यंत भडगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी रात्री ११.वाजता पाचोरा विभागाचे डि.वाय.एस.पी-ईश्वर कातकडे,भडगांव पोलिस निरिक्षक अशोक रावजी उतेकर यांच्यासह पो.हे.कॉ.कैलास गिते,पो.ना लक्ष्मण पाटील,ईश्वर पाटील,स्वप्निल चव्हाण,नितिन रावते यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.