चोपडा-यावल मार्गावर भीषण अपघात ; महीलेसह चौघे जखमी, तर दोघे गंभीर

0

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील गिरळगाव जवळ चोपडा यावल मार्गावर दोन मोटार सायकल वाहनानमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिले सहित पाच जण गंभीर जखमी झाले असून यातील दोन झनांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती व्येद्यकिय सुत्रान कडून मिळालेली आहे.

या संधर्भात मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक 14 डिसेंबर रोजी 2 वाजेच्या सुमारास चोप्रा यावल मार्गावर  मोटार सायकल क्रमांक एम.पी.86 एम.जी.2138 व मोटारसाकल क्रमांक एम.एच.19,8108 यांच्यात समोरासमोर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात सचिन रमेश पावरा वय 20वर्ष राहणार वाघझीरा तालुका यावाल,ज्योती तुफान बरेला वय 17 वर्ष राहणार चांदण्या तलाव तालुका चोपडा,श्रीराम बारेला वय 40वर्ष, तुकड्याकुमार वय 25 वर्ष आणि ओमप्रकाश केलास पटेल वय 42 राहणार तुकईथड जिल्हा खंडवा मध्यप्रदेश यांचा समावेश आहे,घटनेची माहिती याच मार्गाने जाणाऱ्या वाहन धारकांनी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात कळवील्याने त्वरित 108 क्रमांकाच्या वाहनाने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वेद्यकिय अधिकारी बी.बी.बारेला व त्यांच्या सहकारी कर्मच्याऱ्यांनी प्रथमोपचर करून यातील सचिन बारेला व ओमप्रकाश यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णलयात पाठविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.