धक्कादायक.. पोलिसाचा विवाहित महिलेवर 6 वर्षे बलात्कार

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जेव्हा राक्षकच भक्षक होतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतो. पेण येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चक्क पोलिसाने विवाहित महिलेला धमकी देऊन तब्बल 6 वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून या आरोपी पोलिसानी शिविगाळ करीत ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनाच मारहाण केल्याने पेण शहरात चर्चेला उधाण आले आहे.

अलिबाग येथील मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव (रा. शिवाजी नगर, रामवाडी, पेण) याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन २०१५ पासून आज पर्यंत तब्बल ६ वर्षे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अखेर या पिढीत महीलेने पेण पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी शाम जाधव याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी शाम जाधवची पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण 

आरोपी शाम जाधव याच्या विरोधात सदर महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद एकूण घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक यांना शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली.

तसेच शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा. द. वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस ठाणे अधिक तपास करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.