धक्कादायक.. पैशांसाठी कापूस व्यापाऱ्याचा खून; एक जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एरंडोल तालुक्यातील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यावर पाळधी गावाजवळील साईबाबा मंदिरा सामोर अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून ही घटना काल (दि. २६ नोव्हें) रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली.

या चाकूहल्ल्यातील मृत व्यापाऱ्याचे नाव  स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय ३२) आहे. स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुड्डू राजेंद्र चौधरी (वय ३२, रा. फरकांडे) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा धंदा करीत होते.

हे दोघे व्यापारी त्यांची कार होंडा सिटीने क्र. एम एच ०१ – ए एल ७१२७ ते जळगावला त्यांची मालाची रक्कम घेण्यासाठी आले आणि जळगावातून त्यांना मिळालेले रक्कम जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन दोघी व्यापारी त्यांच्या गावी फरकांडे येथे जाण्यासाठी त्यांच्या कारने निघाले असता पाळधी गावापाशी असलेले साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या समोर मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला म्हणून वाद घातला घालून शिंपी आणि त्यांच्या भागीदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून या टोळक्याने बाहेर काढले त्यांच्या मागून पाठीवर, मांडीवर चाकूने सपासप वार केले.

या टोळक्याने झटापटीत स्वप्निल दिलीप चौधरी यांच्या ताब्यातून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु दिलीप चौधरी व स्वप्नील शिंपी यांच्या प्रतिकारामुळे या टोळक्याचा पैसे हिसकावण्याचा प्रयत्न फसला व त्यांची ही रक्कम वाचली.  यावेळी आरडा ओरड सुरु असताना जवळच असलेले पेट्रोलपंपावर ३ ते ४ जणांनी दोघांच्या मदतीला धावून आले व ते लोक येत असल्याचे पाहून सावध झालेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून चौधरी थोडक्यात वाचले मदतीला आलेले लोक पाहून हे हल्लेखोर पसार झाले.

परंतु तो पर्यंत स्वप्नील शिंपी गंभीर जखमी होऊन सुध्दा  दगड  विटांनी या टोळक्याचा प्रतिकार करीत पाळधीच्या दिशेने मदत मिळावी या आशेने धावण्याचा प्रयत्न करीत होते व त्यांचे व्यापारी मित्र दिलीप चौधरी हेही जमेल तसा या हल्लेखोरांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करीत होते.

यावेळी मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी त्यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी  स्वप्निल शिंपी यांना डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. याप्रकणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.