धक्कादायक.. दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म; रुग्णालयातून जन्मदात्यांचा पळ

0

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क

झारखंडची राजधानी रांचीमध्ये असलेल्या रिम्स (RIMS) मध्ये एका नवजात मुलाला सोडून त्याचे पालक पळून गेल्याची घटना घडली आहे. बाळाला सोडून पळून जाण्याचे कारण म्हणजे, त्या नवजात बालकाला दोन डोकी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाला जन्मतःच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल या आजाराने ग्रासले आहे. यात डोक्याचा मागचा भाग थैलीसारखा होऊन दोन डोक्यांसारखा दिसतो.

जन्मदात्यांनी काढला पळ

दोन डोकी असलेल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या निर्दयी पालकांनी त्या बाळाला रुग्णालयात सोडून पळ काडला. पळून गेल्यानंतर मुलाच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी हॉस्पिटलमध्ये नोंदवलेला पत्ताही बनावट असल्याचे आढळून आले. कदाचित त्यांना आधीच कल्पना होती की, त्यांचे मूल सामान्य होणार नाही किंवा त्यांनी आधीच ठरवले होते की मुलाला जन्म दिल्यानंतर पळून जावे लागेल. जन्मानंतर बाळाला आयसीयूमध्ये दाखल करुन कुटुंबीय शांतपणे निघून गेले. पण, आता रिम्सच्या डॉक्टरांनी त्या बाळाला वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

या संस्थेने घेतली बाळाची जबाबदारी

RIMS व्यवस्थापनाने CWC ला मूल एकटे असल्याची माहिती दिली. CWC कडून माहिती मिळाल्यानंतर करुणा संस्थेचे लोक त्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संस्थेतील लोकांच्या म्हणण्यानुसार, बाळाला निओनेटलमधून न्यूरो सर्जरी विभागात पाठवण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस थांबल्यानंतर डॉक्टरांनी बाळावर शस्त्रक्रिया केली. उपचारानंतर बाळाला करुणा आश्रमात नेण्यात येणार आहे. रांचीचे अनेक ज्येष्ठ डॉक्टर मिळून ही संस्था चालवतात.

म्हणून उद्भवते अशी समस्या उद्भवते

आरआयएमएसच्या न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. सीबी सहायने सांगितले की, मुलाला जन्मजात आजार आहे. या आजारात मेंदूचा डोक्याच्या मागचा भाग, CSF बाहेर येऊन थैलीसारखा बनतो. हा हुबेहुब डोक्यासारखे दिसते. वैद्यकीय भाषेत त्याला ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल म्हणतात. डॉक्टरांच्या टीमने मिळून दोन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर हा भाग काढून टाकण्यात आला आहे. सध्या बाळाची प्रकृती ठीक असून, तो डॉक्टरांच्या निगरानीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.