धक्कादायक ! जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

0

जळगाव। शहरातील कांचननगरमध्ये पत्नीचा विष प्राशनाने मृत्यू झाल्यानंतर पतीने धावत्या रेल्वे खाली स्वताला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे की, आत्महत्या करण्याआधी या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करून याची माहिती जगाला दिली आहे.या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला.

 

आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. तर आई-वडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्ह केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.