धक्कादायक.. चांगल्या पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं जात असल्याची अंधश्रद्धेचा कहर करणारी घटना घडली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी पाऊस  झाला आहे. शेतातील पिकंही डोळ्यादेखत खराब होत आहेत. अशावेळी गावकऱ्यांनी जिल्ह्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी परंपरेनुसार चालत आलेल्या काही प्रथा सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडावा म्हणून विविध गोष्टी तसेच  चित्र-विचित्र प्रकार केले जातात.

अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशमधील दमोह गावातील महिलांनी लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवलं आहे. ग्रामीण भागातील लोकांचा असा समज आहे, की लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवल्यास पाऊस येतो. याच अंधश्रद्धेतून त्यांनी असं केलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दमोह जिल्ह्यातील जबेरा तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या बनिया गावातील आहे. शेतीतील पिकं सुकताना पाहिल्यावर गावातील महिला एकत्र आल्या. यानंतर त्यांनी बेडकाला दोरीनं बांधत उलटं टांगलं आणि मग गावातील काही लहान मुलींचे कपडे काढले. यानंतर या मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं.

गावातील महिलांना जेव्हा या अंधश्रद्धेबद्दल या विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं का केलं ते सांगितलं. असं केल्यावर चांगला पाऊस पडतो असं म्हटलं आहे. या प्रकरणी दमोहचे पोलीस अधीक्षक डीआर तेनिवार यांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे. रिपोर्ट येताच कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने या प्रकरणी दमोहच्या कलेक्टरला नोटीस पाठवली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लहान मुलींसोबत केल्या जाणाऱ्या प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.