देशात कोरोनाचा कहर ; 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मृत्यूची नोंद

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतानाचे दिसून येत आहे. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तसच देशात चार हजार 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात ३लाख १८ हजार ६०९ व्यक्ती कोरोनमुक्त झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची देशातील संख्या दोन कोटी 18 लाख 92 हजार 676 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण एक कोटी 79 लाख 30 हजार 960 व्यक्ती कोरोनातून पुर्णपणे बरी होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाख 38 हजार 270 इतकी झाली आहे. तर देशात सध्या 37,23,446 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

करुणाची साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनाची लढण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण केले जात आहे. देशात आतापर्यंत 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 व्यक्तींना कोरोनावरील लस टोचण्यात आली आहे याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.