देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारांवर

0

नवी दिल्ली : देशभरात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांहून अधिक झाला आहे. लॉकडाउनचा आजचा २६ वा दिवस आहे. देशात गेल्या २४ तासात  2 हजार 154 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 365 वर पोहोचला आहे.तर, या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ५०० इतकी झाली आहे. तसेच, या जीवघेण्या आजारातून आतापर्यंत २०१४ रुग्ण बरेही झाले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या जलदगतीने वाढली आहे.  दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे १८६ नवे रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या आहे १८९३, तर त्यांपैकी २०७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत मृतांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. आग्रा येथे करोनाचे ४५ नवे रुग्ण आढळले, करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २४१ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. शनिवारी राज्यात ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ३ हजार ६४८ इतकी झाली आहे. आज आणखी ३४ करोनाबाधित रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.