देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट ; २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रनात येताना दिसतेय. देशभरात मागील २४ तासांमध्ये २२ हजार ६५ नवे करोनाबाधित आढळले असून, ३५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ३४ हजार ४७७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने आता ९९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

 

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९९ लाख ६ हजार १६५ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख ३९ हजार ८२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९४ लाख २२ हजार ६३६ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय, आतापर्यंत देशात १ लाख ४३ हजार ७०९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झालेली आहे.

 

मात्र, राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ डिसेंबरपर्यंत १५, ५५, ६०, ६५५ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ९ लाख ९३ हजार ६६५ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.