देवेंद्र फडणवीस मुक्कामपोस्ट…; नवा पत्ता ठरला

0

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे मागील पाच वर्ष मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आता उद्धव ठाकरे यांना मिळाला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांना सागर हे शासकीय निवासस्थान मिळाले आहे. बंगला मलबार हिल परिसरातच आहे. पण तूर्तास फडणवीस कुटुंब भाडेतत्वावर घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये काही दिवस शिफ्ट होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच ते ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल होणार आहेत.

दरम्यान, ठकरे सरकारमधील मंत्र्यांना सरकारी बंगल्याचे वाटप झाले आहे. छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.