सोलापूरच महापौरपद भाजपाने राखलं !

0

सोलापूर :  सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असून भाजपाने महापौरपद राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. श्रीकांचनमा यन्नम यांना 51 मते मिळाली. तर विरोधातील एमआयएमचे उमेदवार शाहीजदा बानू शेख यांना केवळ आठ मते मिळाली. महत्त्वाचं म्हणजे  भाजपच्या 49 नगरसेवकांची श्रीकांचना यन्नम यांची मतं मिळालीच, पण शिवसेना आणि बसपच्या  प्रत्येकी एका नगरसेवकानेही भाजपला मतदान केलं. काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 4 बसापाचे 3 आणि शिवसेनेचे 20 नगरसेवक तटस्थ राहिले.

सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल असा दावा केला होता. मात्र भाजपाने बाजी मारल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचं चित्र आहे.महापौर निवडीच्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा इत्यादी पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला महापौर निवडून आणणे सहज सोपे झाले. आश्चर्य म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व बसपाच्या स्वाती आवळे यांनीही भाजपला मतदान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.