दृष्टिहीन बांधवांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील – आ. राजूमामा भोळे

0

रेडक्रॉस सोसायटी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव ;- दृष्टिहीन बांधवांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे आश्वासन आ. राजूमामा भोळे यांनी येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ आयोजित कार्यक्रमात केले .

इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ, शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन बांधवांना स्वेटर भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील 60 दृष्टिहीन बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची माहिती देताना दृष्टिहीन महासंघाचे महासचिव हिलाल सपकाळ यांनी रेडक्रॉसने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि दृष्टिहीन बांधवांच्या अडचणी सोडविण्याबाबत विनंती केली. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि. ज्या प्रकारे परमेश्वर आपल्याला ठेवतो त्या परिस्थितीत आपण आनंदी राहिले पाहिजे. प्रत्येक संकटाशी किंवा अडचणीशी सामना केला पाहिजे स्वत: चा इतरांपेक्षा कमी न समजता समाजाच्या बरोबरीने चालत राहा. आम्ही सर्व सदैव आपल्या सोबत राहू.आ. राजूमामा भोळे यांनी सर्वाना सर्वतोपरी मदत करण्यात आश्वासन दिले. आणि काही ही अडचणी असल्यास संपर्क करा असे ही सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकाला स्वेटर देण्यात आले. दलुभाऊ जैन यांच्या वतीने सर्वांसाठी नाश्ता व चहा देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, जिल्हा दिव्यांग केंद्राचे नोडल ऑफिसर जी.टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, दृष्टिहीन महासंघाचे कार्यकर्ते सुनील गावडे, स्वप्नील चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.