जळगाव : सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ ; ‘हा’ आहे आजचा दर

0

जळगाव :  सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली आहे. आज बुधवारी 16 डिसेंबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी दहाच्या सुमारास सोने दरात 107 रुपयांची वाढ होऊन, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49550.00 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात 324 रुपयांची  वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतितोळ्याचा भाव 65177 रुपयांवर पोहोचला.

जळगावातील सोन्याचा भाव 

जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा महागले आहे.  जळगावात आजचे सोन्याचे भाव 50 हजार 600 प्रतितोळे इतका आहे. तर जळगाव सराफ बाजारात चांदी 66 हजार 370 रुपये प्रतिकिलो असा भाव आहे.

 

अमेरिकेत पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेज अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनिश्चितता आणखी वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 

good returns या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२१० रुपये आहे. तर २४ कॅरेट चा भाव ४९२१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२३२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६७०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०९४५ रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५११५० रुपये आहे.

 

ऑगस्टपासून सोनेदरात घसरण

भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत थेट 50 हजारांच्याही खाली घसरली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.