ग्रामपंचायती बिनविरोध केल्यास २१ लाखाचा निधी ; आ.चिमणराव पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी) : आपल्या मतदार संघात ५८ ग्रांमपचायती च्या निवडणुका जाहीर झाल्या असुन या निवडणुका ज्या ग्रामंपचाती बिनविरोध करतील त्याना स्थानिक आमदार निधीतुन २१ लाखाचा निधी दिला जाणार असल्याचा निर्णय अवाहन एरंडोल पारोळा विधान सभा क्षेत्राचे आमदार चिमणराव पाटील यांनी घेतला आहे.

याबाबत अधिक असे कि सध्या राज्यात ग्रामपंचायती च्या निवडणुकी चा कार्यक्रम जाहीर झाला असुन यात पारोळा एरंडोल विधान सभा क्षेत्रात ५८ ग्रामपंचायतीचा समावेश आहे,सध्या अजुन ही आपल्या देशासह राज्यात कोरोना चा प्राधुर्भाव असुन या कोरोना काळात प्रशासकिय अधिकार्यां वर या निवडणुकीचा ताण पडु नये तसेच गावागावतील एकोपा टिकुन राहावा व कोरोनाचे संकट ही बळावु नये व शासनाचा ही ताण व खर्चाची बचत व्हावी म्हणुन पारोळा एरंडोल विधान सभेचे आमदार चिमणराव पाटील यांनी गावाच्या विकासा साठी ह्या निवडणुका बिनविरोध कराव्यात तसेच बिनविरोध निवडणुक झाल्यास गावाच्या विकासासाठी स्थानिक आमदार निधीतुन २१ लाख रूपयाच्या निधी देण्याचे जाहीर केले आहे.

तसेच जास्तीत जास्त ग्रांमपंचायतीनी ह्या निवडणुका बिनविरोध करून कोरोना ला आळा घालावा व प्रशासकिय खर्च टाळावा तसेच या आवाहानाला प्रतिसाद ध्यावा व आपल्या गावाचा विकास करावा असे आवाहन एरंडोल पारोळा विधान सभा क्षेत्राचे आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.