दूसखेडा ते सावदा दरम्यान भुसावळ कटनी पॅसेंजरची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक ….अधिकारी व कर्मचार्यांची धावपळ

0

भुसावळ रेल्वे विभागाने घेतली अपघाताची  रंगीत तालीम

भुसावळ (प्रतिनिधी )-      रेल्वे गाड्यांमध्ये होणारे तांत्रिक बिघाड व नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणामुळे होणाऱ्या रेल्वे अपघातांवर त्वरीत व सुनियोजित पद्धतीने कारवाई कशी करता येईल येईल याची रंगीत तालीम मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने शुक्रवार ३ जानेवारी रोजी  घेतली.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ रेल्वे विभागाने  सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी भुसावळ खंडवा रेल्वे प्रभागातील दूसखेडा ते सावदा दरम्यान असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 158 जवळ भुसावळ कटनी पॅसेंजरने एका ट्रॅक्टर ट्रॉली ला धडक दिल्याची बतावणी करण्यात आली. भुसावळ येथे अपघात घडल्याचे संबंधित यंत्रणेला सूचना देणारे भोंगे वाजवण्यात आले.

त्यानंतर दुर्घटना सहायता गाडी संबंधितांना घटनास्थळी घेऊन गेली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, अपर रेल्वे मंडळ प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक आर के शर्मा, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरिष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन के अग्रवाल, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक स्वप्नील नीला यांच्यासारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीवर कशाप्रकारे उपायोजना कराव्यात याची रंगीत तालीम घेतली. रंगीत तालमीचा निर्धारित कालावधी उलटल्यानंतर रेल्वे् प्रशासनाने अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाची तयारी कितपत आहे याचा लेखाजोखा घेणारी रंगीत तालीम घेतल्याची माहिती माध्यमांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.