दूध बूथ फोडून रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव  शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर रस्त्यालगत असलेले विकास दूध बुथ फोडून चोरट्यांनी ८ हजारांची रोकड लंपास केली आहे.

शहरातील धांडे नगरात राहणारे जितेंद्र नारायण प्रजापत यांचे विकास दूध बुथ मुख्य पोस्ट ऑफिससमोर आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून ते नेहमीप्रमाणे घरी गेले. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता दरवाज्याचे दोन्ही कुलूप तुटलेले त्यांना दिसून आले.

चोरट्यांनी दुकानातून ड्रॉवर फोडून ७ ते ८ हजारांची रोकड लंपास केली आहे. जितेंद्र प्रजापत यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.