दुर्दैवी : पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

0

चाळीसगाव प्रतिनिधी । पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणावर घडली. या घटनेमुळे वरखेडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वरखेडे बुद्रुक येथील रहिवाशी हिरतसिंग जगतसिंग पवार व पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हे काका पुतणे दोघे आज सकाळी ८ वाजता तालुक्यातील वरखेडे लोंढे येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हा पाण्यात पोहत असतांना पाण्यातील जाळ्यात अडकला होता. पुतण्या पाण्यातून वर न आल्याचे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी देखील पाण्यात उडी घेतली. यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर धाव घेवून दोघांचे मृतदेह काढण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आज सायंकाळी ५ वाजता दोन्ही पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.