खाद्यतेल महागले; मोहरीचाही भाव वाढणार

0

नवी दिल्ली : कोरोना महामारीत आधीच रोजगाराच्या चिंतेने त्रस्त केले आहे. त्यात आता वाढती महागाई पुरती हैराण करून सोडणार आहे.  राजधानी दिल्लीच्या तेल बाजारात सोयाबीन तेलबिया तसेच कपाशी, क्रूड पाम ऑइल (सीपीओ) आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत वाढ झाली. शिकागो एक्सचेंजमधील दोन टक्क्यांची सुधारणाही यामागील कारण आहे. पुढील 10 -15 दिवसांत मोहरीच्या दाण्याची मागणी वाढून याच्या किमतीतही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मंडईमध्ये भुईमुगाच्या उन्हाळी पिकांची आवक वाढल्याने शेंगदाण्याचे तेल आणि तेलबिया यांचे दर तोट्यासह बंद झाले. स्थानिक स्तरावर डीओसीला जास्त मागणी असल्याने आणि शिकागो एक्सचेंजमध्ये वाढ झाल्यामुळे सोयाबीन तेलबियाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिकागो एक्सचेंजवर किंमतीत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, मलेशिया एक्सचेंजमध्ये अर्ध्या टक्क्यांनी घसरण झाली असूनही सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, राजस्थानातील आग्रा, सलोनी आणि कोटामध्ये मोहरीचा भाव 7,450 रुपये क्विंटलवरून 7,500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. पावसाळ्यात पुढील 10-15 दिवसांत मोहरीची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.