दुचाकीने जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात बाटली मारून चौघांनी सत्तर हजार रुपये लांबविले

0

पारोळा:- आपल्या दुचाकीने मंगरूळ गावे जाणाऱ्या 26 वर्षे तरुणाला थांबवून त्याच्या खिशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता डोक्यात काचेची बाटली मारून त्याला जखमी करून त्याच्य खिशातून 70हजार रुपये जबरी हिसकावून नेल्याचा प्रकार सात रोजी सायंकाळी घडला असून या प्रकरणी पोलिसात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मंगरूळ येथील रहिवासी सुनील ज्ञानेश्वर मोरे हे आपल्या दुचाकीने सात सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पारोळा ते मंगरूळ रोडवरील गोशाळेच्या पुढे एकाने त्यांना थांबवून त्यांच्या खिशात बळजबरी हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी करून डाव्या खिशातील 70 हजार रुपयांची रोकड काढून चार जणांनी पोवारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.