आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

0

हैदराबाद;-आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी भल्या पहाटे अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री उशीरा त्यांना अटक वॉरंट देण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूंनीही अशा प्रकारे आपल्याला अटक केली जाण्याला विरोध केला. मात्र, अखेर सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून आता वैद्यकीय तपासणीनंतर चंद्राबाबू नायडूंची रवानगी तुरुंगात होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.

चंद्राबाबू हे नंदयाला दौऱ्यावर होते. एका बसमध्ये ते थांबले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. आधी पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना अटक केली. कौशल विकास घोटााळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान कौशल विकास घोटाळ्याची कोणत्याही पुराव्याशिवाय कोर्टात केस सुरू असताना चंद्राबाबू यांना अटक करण्याची गरज काय? असा सवाल या निमित्तान केला जात आहे. चंद्राबाबूंच्या वकिलांनी कागदपत्रे आणि एफआयआरची कॉपी मागितली असता आम्ही तुम्हाला रिमांड रिपोर्ट देऊ शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.