दुचाकीच्या समोरासमोर धडकेत १ ठार ; २ जखमी

0

जामनेर : – तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक जवळ दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघ जण जखमी झाल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.या अपघातात धर्मराज गोपीचंद पाटील वय ३६ रा.पाचोरा रोड जामनेर हा जागीच मृत्यू झाला.

तर प्यारसिंग बारेला वय ४५ , रामा बारेला वय ३५ दोघ राहणार गोंडखेल ता.जामनेर हे दोघं जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुचाकी क्रमांक एम.एच.१९ बी.क्यु ७८३४ व एम एच १९ डी एच ७६०४ यांचा धडकेत पार चुराडा झाला.  अपघाताची माहीती मिळताच शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,पंसगटनेते अमर पाटील आदींनी जखमींची विचारपुस करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव हलवीण्यास सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.