बोदवड येथील सर नेमाडे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?

0
सुनिल बोदडे
बोदवड – येथील जामनेर रोडवरील सर सत्यजीत नेमाडे विद्यालयात येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून येथील विद्यार्थ्यांना दुषित पाणी पाजून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे.
येथील जामनेर रोडवर गौरक्षण संस्थाची पुरातन विहीर असून तिची गेल्या कित्येक वर्षांपासून साफसफाई करण्यात आली नसल्याने त्यात शेवाळे,घाण कचरा,घाणरेडे कपडे,यांसह अनेक शरिरास घातक असलेले पदार्थ व प्लास्टिकचे कॅरीबॅग साचले असून याचं विहीरीचे पाणी विद्यार्थी पीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.मात्र विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेल्या खेळाकडे मुख्याध्यापक व शाळा प्रशासानाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
दुषित पाण्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भयंकर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता असून याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
संपुर्ण तालुक्यात विविध आजारांनी तैमान घातले असून अनेकांना विविध आजारांची लागण झाली असून अनेकांवर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज सकाळी येथील प्रभाग क्रं.५ मधील नगरसेविका असलेल्या सुशिलाबाई मधूकर खाटिक यांची नात श्रावणी दिलीप गंगतिरे हिचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली असतांनाच येथील सर सत्यजित नेमाडे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.