दुचाकीच्या डिक्कीतून ३८ हजाराची रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील विसनजी नगर भागातील क्रिमसन फूड दुकानासमोर लावलेली दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आलीय.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर पन्नालाल भंडारी (वय ६६, रा. विसनजी नगर) हे  काल गुरूवारी २३ सप्टेंबर रोजी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान विसनजी नगरातील होमगार्ड कार्यालयाजवळील  क्रिमसन फूड या दुकानासमोर त्यांनी स्कूटर (एमएच १९ एआर ४४०१) पार्किंगला लावली होती.

अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत डिक्कीत ठेवलेले ३७ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच मोबाईल चार्जर, पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल लंपास केला आहे.  किशोर भंडारी यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेतली.  भंडारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.