दारु चोरी प्रकरणी दोघांना अटक

0

खामगांव : राष्टीय महामार्गावरील कोलोरी फाट्यावरील देशी दारुचे दुकान फोडल्याप्रकरणी डीवायएसपी पथकाने दोघांना अटक केली आहे .कोलोरी फाट्यावर हितेश लक्ष्मण आयलाणी यांचे देशी दारुचे दुकान असुन 6 एप्रिलच्या राञी अज्ञात चोरट्यानी ही दुकान फोडुन देशी दारुचे 50 बाॅक्स(कीमत  1 लाख 30 हजार)  चोरुन नेले होते .याप्रकरणी आयलानी यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलीसानी अज्ञात चोरट्यांविरुद्द गुन्हा दाखल केला होता.दरम्यान , डीवायएसपी पथकाने तपासचक्रे फिरवुन तिञव येथुन विठ्ठल रमेश मुडांले (37) रा.तिञव व आशिष जाभे (34) रा.महाकाळ चौक खामगांव याना एका क्रुझरसह  अटक केली आहे .तसेच त्यांच्याकडुन देशी दारुचे 2  बाॅक्स ताब्यात घेतला .  यावेळी त्याना पोलीसी खाक्या दाखवताच त्यानी चोरीची कबुली दिली

Leave A Reply

Your email address will not be published.