दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

0

पारोळा :- तालुक्यातील सावखेडा होळ येथील इंद्रदेव महाराज आश्रमात दागिने चोरत असल्याच्या कारणावरून दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, आज गुरुपौर्णिमानिमित्त दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडले. यावेळी अंगझडती बंदोबस्तवरील महिला पोलीस कर्मचारी ज्योती चव्हाण व संगीता मोरे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २ सोन्याच्या पोत व १ सोन्याची चैन अश्या वस्तु पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या दोघ महिलांना पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाने पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे यांनी रंगेहाथ पकडले. तपास पोलीस निरीक्षक .लिलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाने पो.हे.काँ.प्रकाश चौधरी पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.