भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती

0

मुंबई :- भाजपाचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेरीस पक्षाकडून राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांची या पदासाठी निवड करण्यात आली. तर याच बरोबर मुंबई भाजपा अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची निवड केल्या गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.