दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांना प्रारंभ

0

जळगाव ;- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारपासून दहावी व बारावीची फेर परीक्षेला सुरुवात झाली असून

जिल्ह्यात दहावीचे १०८४ विद्यार्थी १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत आहे. तर बारावीचे १२७५ विद्यार्थी ८ केंद्रांवर परीक्षा देणार आहे.नूतन मराठा विद्यालयातील केंद्र क्र. ३७०५ (ब)मध्ये मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाची दहावीची फेर परीक्षा २० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान होणार आहे. तर बारावी परीक्षेसाठी केंद्र क्रमांक ९३०ची इंग्रजी विषयाची कला शाखेची बैठक व्यवस्था एस ००४४९५ ते एस ००५२१० महाराणा प्रताप हायस्कूल प्रेमनगर, विज्ञान शाखा एस ०००९७ ते एस ००११४४, वाणिज्य शाखा एस ००६६४५ ते एस ००६७५३, किमान कौशल्य शाखा एस ००७२३० ते एस ००७३७२ एम. ए. आर अँग्लो उर्दू हायस्कूल व हाजी नूर मोहंमद चाचा ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आली आहे, असे महाविद्यालय व शाळांतर्फे कळविण्यात अाले अाहे.  आज मराठी विषयाची परीक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.