सलग पाचव्या सत्रात सोन्याच्या दरात झाली घसरण ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : आज शुक्रवारी सलग पाचव्या सत्रात सोने दरात घसरण झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०१५६ रुपये आहे. त्यात १६४ रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी सोने ४९९९२ रुपयांवर बंद झाले होते. चांदीमध्ये आज तेजी आहे. चांदीचा भाव एक किलोला ६१९२४ रुपये आहे. त्यात ४१४ रुपयांची वाढ झाली आहे.

मागील सत्रात सोने ३५० रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीचा भाव १००० रुपयांनी कमी झाला होता. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचण्यांनी भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली होती. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला होता. मात्र अमेरिकेत करोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०८६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९३७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३८५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००५० रुपये मोजावे लागतील. तर २२ कॅरेटचा भाव ५२४५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४७४५० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५१८३० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.