कळंत्री प्राथमिक विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

0

चाळीसगाव  ;– येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कंळत्री, या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी,महाराष्ट्र परीक्षा परिषद,पुणे तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षा गुणवत्ता यादीत कळंत्री विद्यालयातील इ.५वीच्या ०५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तसेच इ.८वी एका विद्यर्थिनीने देखील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक दिपाली पाटील,भुषण बाग,पंकज सोनवणे, मुकेश खलाल या सर्व शिक्षकांचे शाळेचे चेअरमन डॉ.सुनीलजी राजपुत यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी खालील प्रमाणे-राधिका कासार ,अथर्व मगर,, गिरीष बाविस्कर ,  वेदांत पाटील , हर्षा मोरे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक (इयत्ता आठवी)विद्यार्थी- प्रतिज्ञा पाटील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.