दलित पॅथरचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

0

जळगांव- प्रतिनिधी
भुसावळ शहरासह तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सरकारी गोडाऊन मधुन आठ वर्षापासुन बेसुमार अनागोंदी कारभार झाला आहे. यामुळे गोडाऊनची शासकीय दफ्तर मेंटन करणार्‍या सर्व रेकॉर्डची हस्ताक्षर तज्ञाकडुन चौकशी करावी, या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पॅथरने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
शहरातील 30 पेक्षा अधिक धान्यदुकानांनी नियम धाब्यावर बसवुन कार्डधारकांच्या रहिवासापासुन दीड ते दोन किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या स्वरुपात दुकाने जोडले असुन खोटे रेकॉर्ड दाखविले आहे. याची चौकशी व्हावी. यासह धान्य घोटाळा करणार्‍यांना मोका लावावा, धान्याची अधिक भावाने विक्री करणार्‍या माफियांवर गुन्हे दाखल करावे या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. राष्ट्रीय दलित पॅथरचे माजीकार्याध्यक्ष विजय साळवे, सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, प्रमोद पाटील, कैलास पारधी, समाधान चौधरी, बालाजी पठाडे, दीपक सोनवणे, कुणाल सुरडकर, राजु महाले, प्रेमचंद सुरवाडे, रवी सोनवणे यांनी हे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.