दगडी सबगव्हाण येथील ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव संमत

0

महिलांनी घेतला पुढाकार

पारोळा -प्रतिनिधी

गांवात दारु विक्री बंद करा, दारु पिऊन आमच्या कुंटूब्याची राख रांगोळी झाली आहे . आता गावात दारु बंदी करण्याचे आवाहन महीलांनी केले. दगडीसबगव्हाण  येथील महिलांनी आयोजित ग्रामसभेत केल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे . पारोळा तालुक्यातील दगडीसबगव्हान येथे

काहि दिवसा पुर्वी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . यात गावाच्या विविध समस्यावर चर्चा सुरू असतानाच उपस्थीत महिलांनी दारूबंदीचा ठराव करा .. या विषयावर पदाधिकाऱ्यावर संताप करीत . दारु बंदीचा ठराव पारीत करा . तुम्हाला जमत नसेल तर खुर्च्या खाली करा … महिलांचे उग्र रुप बघुन  ठराव पारित करण्याचा लवकरच निर्णय होऊन.. दारु .. गावातुन हद्दपार करण्याचा विश्वास या वेळी देण्यात आला या  ग्रामसभेच्या अध्यक्षस्थांनी प्रथम लोकनियुक्त सरपंच संगिता नंदलाल पाटील यांनी व सचिव रत्ना भदाणे यांनी काम पहिले व ग्रामसभेत ग्रामस्थांनी व महिलांनी अवैध दारू बंदी व अवैध धंदे विषयी ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठराव संमत करण्यात आला त्या वेळी छोटू पाटील,नंदलाल पाटील,संभाजी पाटील,अशोक पाटील,उपसरपंच साहेबराव पाटील, राजु मोरे,रविद्र  पाटील,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.