दक्षिण काश्मीर मधील भाजपा
कार्यकर्त्यांच्या हत्येचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे निषेध

0

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगांव- दक्षिण काश्मीर मधील कुलगाम येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस फिदा हुसैन यांच्यासोबत 3 भाजपा कार्यकर्त्यांची दहशतवादयांनी क्रुरपणे गोळया घालुन हत्या केली. सदर घटनेचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे निषेध करण्यात आला असून, सदर हत्येस जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी जळगांव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीश महाजन,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.शहेबाज शेख व महानगर जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी खा.उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, जि प अध्यक्षा रंजनाताई पाटील, आ.चंदू पटेल, आ.मंगेश चव्हाण, पोपट भोळे, लालचंद पाटील, अमोल शिंदे, अमोल नाना पाटील, सुनील काळे, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, दीप्ती चिरमाडे, नितीन इंगळे, डॉ.राधेश्याम चौधरी,दीपक साखरे, नीला चौधरी, मनोज भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या निवेदनात म्हंटले आहे की, सदर कार्यकर्त्यांची सर्रासपणे हत्या म्हणजे दहशतवादयांकडून लोकशाहीचा खून असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. जम्मू काश्मीर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येची ही पहिली घटना नसुन, दहशतवादयांनी मागिल काही महिन्यात अनेक भाजपा कार्यकर्त्यांची निर्दयीपणे हत्या केली आहे. गेल्या महिन्यातच मध्य काश्मीरमध्ये बडगाम जिल्हयात एक भाजपा कार्यकर्ता व दलवास गावात ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलर यांची गोळी घालुन हत्या करण्यात आली होती. तसेच जुलै महिन्यात
बांदीपोरामध्ये माजी जिल्हाध्यक्ष वसीम अहमद बारी त्यांचे वडील आणि भावाची सुध्दा हत्या केली होती. त्यामुळे सरकारने जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपविणे गरजेचे असून,भाजपा नेता व कार्यकर्त्यांची सुरक्षाव्यवस्था सुध्दा करणे महत्वाचे आहे.

कुलगाम येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे फिदा हुसैन, उमर रशीद बेग, उमर रमजान यांच्या हत्येचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. या हत्येची जबाबदारी स्विकारणा-या द रजिस्टेंस फ्रंट ( टी आर एफ ) नामक अतिरेकी संघटनेवर कारवाई करण्यात येवून, या घटनेतील दहशतवादयांना लवकरात लवकर अटक
करण्याची मागणी सुध्दा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे करण्यात आली आहे.

निवेदनावर अॅड.शहेबाज शेख,गुड्डू पठाण, मोहम्मद नूर शेख, सैयद शब्बीर अली,जुलफेकार पटवे, युसुफ खान, युनुस शेख, फिरोज खान यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.