थकबाकीचा ओघ सुरुच; 34 गाळेधारकांकडून 1 कोटीचा भरणा

0

जळगाव- महापालिकेकडून सेंल फुले मार्केट व फुले मार्केट मधील गाळेधारकांना 81 क ची नोटीस बजावल्यानंतर 15 दिवसांत 200 गाळेधारकांनी 9 कोटीची रक्कम भरली असून गुरुवारी 34 गाळेधारकांनी1 कोटीपर्यंतच्या रक्कमा 34 चेकद्वा जमा केल्याची माहिती उपायुक्त उत्कर्ष गुटे यांनी दिली. याद्वा मनपाच्या गंगाजळीत 10 कोटी रु. जमा झाले आहेत.
घरकूल प्रकरणामुळे गाळेधारकांबाबत पदाधिकार्‍यांनी हात वर केले आहेत. गाळेधारकांना बिलांत कपात करुनही दिली आहे. यापुढे आणखी काय सवलत देणार? असा सवाल पदाधिकार्‍यांकडून विचारला जात आहे. 2012 मध्येच गाळ्यांची मुदत संपल्यावरही गाळेधारकांकडून गाळ्यांचा अनधिकृत वापर सुरु आहे. याबाबत गाळेधारक उच्च न्यायालयातही जावून आले आहेत. सर्वत्र पदरी निराशा आल्याने शेवटी गाळेधारकांना थकबाकी जमा करण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने गाळेधारक बिलाच्या रक्कमेतून निम्मे- निम्मे थकबाकी भरत आहेत.
मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार
महानगरपालिकेडून एक रुपयाचीही थकबाकी नाही भरणार्‍या मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शहरातील 18 व्यापारी संकुलात काही लहान मार्केटही असून त्यात लहान व्यवसायीक आहेत. मोठ्या मार्केटबरोबर त्यांनाही तितकीच बिले भरावी लागणार असल्याने ते संकटात आले आहेत. याबाबत गाळेधारकांतही एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. नुकतीच फुले मार्केटमधील कबुतरखानाच्या जागेचा झवर नामक औषधी दुकानदाराचा अवैध वापर सुरु होता त्यालाही सील लावण्यात आल्याने गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली असून कारवाईच्या भितीपोटी थकबाकी भरण्याची मानसिकता तयार होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.