जुनी सरस्वती डेअरीजवळील अतिक्रमण काढले

0

लोखंडी गेट लावून रस्ता केला होता बंद
जळगाव- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उपायुक्त उत्कर्ष गुटे यांच्या आदेशाने गुरुवारी लोखंडी गेट जेसबीच्या सहाय्याने तोडून रस्ता सुरु केला.
जुनी सरस्वती डेअरीच्या बोळीतील रस्ता थेट जोगळेकर यांच्या दुकानाकडून जातो. मात्र अतिक्रमणधारकांनी त्या रस्त्यालाच लोखंडी गेट लावून रस्ता मनमानीने बंद केला होता. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. दोन्ही बाजूने रस्ता अनेक वर्षांपासून बंद असल्याने तेथे घाण साचली होती. तीन क घाण काढण्यात आली. या ठिकाणी सळयांचे 10 बंडल आढळून आले यासह लोखंडी गेट प्रशासनाकडून जप्त करण्यात येवून हा रस्ता खुला करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.